मुक्त झाली

एक कविता मनातली 
मुक्त झाली ........

वेदनांच्या अवकाशात कोंडून घेत तिने सोडला शेवटचा श्वास
आणि अचानक मलाच मोकळे झाल्यासारखे वाटलं,
जीवाला काळजी होती ,बाई जगते की काय?
पण नाही माझा विश्वास होता परमेश्वरावर ,तो दयाघन इतकाही वाईट नाही
की त्याने ऐकलीच नसेल तिची हाक, त्याला माहित आहे अशा परिस्थितीत जगण्यापेक्षा
मरणे जास्त आश्वासक आहे....कारण प्रश्न संपून जातात क्षणात
लोक आपापल्या मार्गाला लागतात.. आणि व्यवस्था ? त्या थोडीशी कूस बदलतात
आणि पुन्हा सुस्तपणे पडून राहतात....
ती असती तर किती कठीण झालं असते ,तिच्या बरोबरच्या साऱ्यांचे जगणे
त्यांनाच मान खाली घालून चालावे लागले असते..आणि मग ती रोज मरत राहिली असती!
म्हणून म्हंटले बर झाले गेली...सगळयांची सुटका झाली
तिची, व्यवस्थेची आणि त्या परमेश्वराचीही
त्यालाही रोज ऐकायला लागले असते शिव्याशाप आणि वेदनेचे गाणे!
हुश्श बरं झालं तिच्याबरोबर सारेच मुक्त झाले...
मनीषा शेटे
10/02/2020

Comments