पसायदान ज्ञानेशाचे.. अतीव अवहेलना आणि दुःख सहन करूनही ज्ञानदेवांच्या मुखातून पसायदान कसे उमटले ! माणसाच्या जगण्याचा आधार सुटतो तेव्हा सर्वात प्रथम समाज त्याला एकटा पडतो . त्याच्यातील असलेल्या आणि कदाचित नसलेल्याही उणेपणाची जाणीव त्याला प्रकर्षाने करून देतो . समाज म्हणजे एक सामूहिक मानसिकता असलेला गट. या गटाला स्वतःचे भान विसरून जगायला आवडते कारण तसे वागले की जे काही घडेल अथवा बिघडेल त्याची जबाबदारी समूहावर येते . व्यक्तींची एक अर्थाने त्यातून सुटका होते . यासाठीच समाजभान हा शब्द खूप अर्थ घेऊन येतो . संन्याशाच्या पोरांची समाजाने अवहेलना केली , तेव्हा या मुलांना त्यांची काहीच चूक नसताना शिक्षा भोगायला लागली तेही अशा निरागस वयात की जेव्हा त्यांना समाजाच्या आधाराची गरज होती. ...
Posts
Showing posts from April, 2020