देव, दैव की अपेक्षेसह कर्म बरे ?
देव ,दैव की अपेक्षेसह कर्म बरे ? जगात दोन प्रकारची माणसे असतात. काहीजण कर्मावर विश्वास ठेवणारी असतात तर काही नशिबाच्या आहारी जातात. दोन्ही प्रकारे बघायचे म्हंटले तरी सुख आणि दुःख असते ते दोघांच्याही वाट्याला येत असतेच. 'यश मिळाले तर ते माझे आणि अपयश मिळाले तर ते दुसर्यांमुळे', ' मी आनंदी माझ्यामुळे आणि मी दुःखी इतरांमुळे' असे गणित मांडणारी अनेक माणसे असतात. 'नशीब' आणि 'कर्म' या फार वेगळ्या गोष्टी आहेत. भर्तृहरी सारखा संस्कृत कवी म्हणतो ' देवांना नमावे तर ते स्वतः विधिच्या अंकित असतात तेव्हा विधिला वंदावे हे बरे , पण ज्याच्या त्याच्या कर्माला अनुसरून नियती देत असते त्यामुळे विधी हे कर्माच्या अधीन मानले जातात .असे जर असेल तर 'देव' व 'विधी' म्हणजे नशीब यांचे काही महत्त्व उरत नाही. म्हणून विधीसुद्धा ज्याच्यापुढे हतबल ठरतो त्या कर्माला आपण वंदूया.' कोणतेही कर्म करताना त्याबद्दल अपेक्षा ठेवू नये असे सांगितले जाते. परंतु काहीतरी अपेक्षा ठेवून कर्म केले तर ते कदाचित अधिक प्रामाणिकपणे होते का? अस...