Posts

 पसायदान ज्ञानेशाचे..                 अतीव अवहेलना आणि दुःख सहन करूनही ज्ञानदेवांच्या मुखातून पसायदान कसे उमटले ! माणसाच्या जगण्याचा आधार सुटतो तेव्हा सर्वात प्रथम समाज त्याला एकटा पडतो . त्याच्यातील असलेल्या आणि कदाचित नसलेल्याही उणेपणाची जाणीव त्याला प्रकर्षाने करून देतो . समाज म्हणजे एक सामूहिक मानसिकता असलेला गट. या गटाला स्वतःचे भान विसरून जगायला आवडते कारण तसे वागले की जे काही घडेल अथवा बिघडेल त्याची जबाबदारी समूहावर येते . व्यक्तींची एक अर्थाने त्यातून सुटका होते . यासाठीच समाजभान हा शब्द खूप अर्थ घेऊन येतो .                 संन्याशाच्या पोरांची समाजाने अवहेलना केली ,  तेव्हा   या   मुलांना त्यांची काहीच चूक नसताना   शिक्षा भोगायला लागली तेही अशा निरागस वयात की जेव्हा त्यांना समाजाच्या आधाराची गरज होती. ...

देव, दैव की अपेक्षेसह कर्म बरे ?

 देव ,दैव की अपेक्षेसह कर्म बरे ?           जगात दोन प्रकारची माणसे असतात. काहीजण कर्मावर विश्वास ठेवणारी असतात तर काही नशिबाच्या आहारी जातात. दोन्ही प्रकारे बघायचे म्हंटले तरी सुख आणि दुःख असते ते दोघांच्याही वाट्याला येत असतेच. 'यश मिळाले तर ते माझे आणि अपयश मिळाले तर ते दुसर्‍यांमुळे', ' मी आनंदी माझ्यामुळे आणि मी दुःखी इतरांमुळे' असे गणित मांडणारी अनेक माणसे असतात. 'नशीब' आणि 'कर्म' या फार वेगळ्या गोष्टी आहेत. भर्तृहरी सारखा संस्कृत कवी म्हणतो ' देवांना नमावे तर ते स्वतः विधिच्या अंकित असतात तेव्हा विधिला वंदावे हे बरे , पण ज्याच्या त्याच्या कर्माला अनुसरून नियती देत असते त्यामुळे विधी हे कर्माच्या अधीन मानले जातात .असे जर असेल तर 'देव' व 'विधी' म्हणजे नशीब यांचे काही महत्त्व उरत नाही. म्हणून विधीसुद्धा ज्याच्यापुढे हतबल ठरतो त्या कर्माला आपण वंदूया.'            कोणतेही कर्म करताना त्याबद्दल अपेक्षा ठेवू नये असे सांगितले जाते. परंतु काहीतरी अपेक्षा ठेवून कर्म केले तर ते कदाचित अधिक प्रामाणिकपणे होते का? अस...

शिक्का

                         उमटवलेल्या सगळ्याच खुणा जपाव्या अशा नसतात                          त्यातल्या काहींवर असतो वेदनेचा एक शिक्का                           जो काही केल्या मिटत नाही                           कितीदा पुसावा? पण ओरखडा जात नाही!              आपल्या सहवासात चांगली वाईट अनेक प्रकारची माणसे येत असतात. काही माणसांना किंवा व्यक्तींना आपण स्वतःहून सामावून घेतो , काही व्यक्ती अनाहूतपणे आपल्यामध्ये शिरतात. पण एकूण आपल्या जीवनात माणसे नेहमीच मध्यवर्ती असतात.तरीही आपण त्यांना  शिक्के  मारत फिरत असतो.             आपल्यासारख्या गावात , शहरात राहणाऱ्या लोकांना माणसांपासून दूर राहून काही चालण्यासारखे नसते. अगदी एकटेपणा आवडणारा माणूसही त्...

मुक्त झाली

एक कविता मनातली  मुक्त झाली ........ वेदनांच्या अवकाशात कोंडून घेत तिने सोडला शेवटचा श्वास आणि अचानक मलाच मोकळे झाल्यासारखे वाटलं , जीवाला काळजी होती , बाई जगते की काय ? पण नाही माझा विश्वास होता परमेश्वरावर , तो दयाघन इतकाही वाईट नाही की त्याने ऐकलीच नसेल तिची हाक , त्याला माहित आहे अशा परिस्थितीत जगण्यापेक्षा मरणे जास्त आश्वासक आहे .... कारण प्रश्न संपून जातात क्षणात लोक आपापल्या मार्गाला लागतात.. आणि व्यवस्था ? त्या थोडीशी कूस बदलतात आणि पुन्हा सुस्तपणे पडून राहतात .... ती असती तर किती कठीण झालं असते , तिच्या बरोबरच्या साऱ्यांचे जगणे त्यांनाच मान खाली घालून चालावे लागले असते .. आणि मग ती रोज मरत राहिली असती ! म्हणून म्हंटले बर झाले गेली ... सगळयांची सुटका झाली तिची , व्यवस्थेची आणि त्या परमेश्वराचीही त्यालाही रोज ऐकायला लागले असते शिव्याशाप आणि वेदनेचे गाणे ! हुश्श बरं झालं तिच्याबरोबर सारेच मुक्त झाले ... मनीषा शेटे 10/02/2020

पावती मिळाली

कोऱ्या कागदावर त्याने उमटविला एक कधीही न पुसता येणारा ठसा आणि चार अक्षरे सहीची ...ही घे पावती नि:शब्दपणे मी तो कागद उचलला ती पावती होती? की संपलेल्या नात्याची निशाणी ! आजपर्यंत केलेल्या प्रेमाची,वाहिलेल्या वेदनांची झालर होती त्या सुरकुतलेल्या कागदाला, कागद? कोरड्या मनाने खरडलेल्या सहीच्या आजूबाजूला नव्हती कसलीच निशाणी आपल्या नात्याची.... व्यावहारिक जगात एखादी गोष्ट अथवा व्यवहार पूर्ण झाल्यावर आपल्याला पावती मिळते.अनेकदा पावती मिळत नसेल तर आपण ती आवर्जून मागून घेतो. खरेतर पावती कशाकशाची मिळू शकते ? तर कशाचीही ...अगदी सहा रुपयाचा चहा तुम्ही प्यायलात तरी तुम्ही पावती मागू शकता. बागेत आपण जातो तर तिथे प्रवेशाला दोन रुपये असतात. आपण दोन रुपये देतो आणि ती बारकीशी पावती खिशात किंवा पर्समध्ये टाकतो. काहीजण हातातच ती खेळवत राहतात आणि बागेतून बाहेर पडताना तिथेच फाडून फेकून देतात. वास्तविक पाहता आर्थिक व्यवहाराच्या बाबतीत पावतीला अगदी अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि असायलाच हवे कारण त्यातून व्यवहार पारदर्शी होतो.फसवणूक टाळता येते.पावती हरवली तर मात्र यातील काहीच होऊ शकत नाही.पण...